अग्निशमन दलाच्या 'या' चार अधिकाऱ्यांना मिळणार राष्ट्रपती पुरस्कार

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • सिविक

मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे, उपअग्निशमन अधिकारी (तांत्रिक) आर. ए. चौधरी यांच्यासह अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांची यंदाच्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मुंबई अग्निशमन दलातील गुणवंत सेवेबद्दल त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती पुरस्कारासाठी गुणवंत सेवेबद्दल गृह विभागाच्या माध्यमातून राज्यातून अर्ज मागवले जातात. त्यातून राष्ट्रपती पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड केली जाते. त्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे, उपअग्निशमन अधिकारी आर. ए. चौधरी, लिडींग फायरमन सुधाकर तांबे, लिडींग फायरमन नंदकिशोर बावलेकर यांची निवड झाली आहे. त्यामुळे या सर्वांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्याकडे मुंबई अग्निशमन दलाबरोबरच महाराष्ट्र फायर सर्विसेसचाही भार आहे. मुंबई अग्निशमन दलाचा तांत्रिक ज्ञान असलेले आर. ए. चौधरी हे एकमेव अधिकारी आहेत, ज्यांना या दलातील सर्व अत्याधुनिक यंत्रे चालवण्याचे ज्ञान आहे. या सर्व यंत्रांची मेकॅनिकल माहितीही चौधरी यांना अवगत अाहेत. त्यामुळे ते अग्निशमन दलाचे टेक्निकल फायर ऑफिसर म्हणून ओळखले जातात.

पुढील बातमी
इतर बातम्या