मुंबै बँकेने कुणालाही नियमबाह्य कर्ज दिलेले नाही - दरेकर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबै बँकेने कोणतेही नियमबाह्य कर्ज कुणालाही दिले नसल्याची माहिती मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. कर्ज वाटप करताना नाबार्ड आणि आरबीआयच्या नियमांचे पालन केले जाते, असे सांगत विरोधकांच्या आरोपांचे त्यांनी खंडण केले. तसेच शिक्षकांना आम्ही अनेक सेवा देणार आहोत. मात्र काही संघटना शिक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांसाठी 9.5 ते 10 टक्क्यांनी कर्ज उपलब्धही करण्यात येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर खातेदारांना अतिरिक्त व्याजासह डेबिट कार्डवर विविध सुविधा आणि सवलती देऊ, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यात बँकेला 6 कोटींचा फायदा देखील झाल्याचे त्यांनी सांगितले.

काय सांगतो मुंबै बँकेच्या घोटाळ्याचा अहवाल -

- मुंबई बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा स्वत:च्या स्वार्थासाठी गैरवापर केला

- बँकेचे सभासद आणि ठेवीदारांचा विश्वासघात करणाऱ्या संचालकांवर तसेच अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी

- चौकशी आणि तपासणीच्यावेळी बँकेचे सहकार्य नाही. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध न केल्यामुळे घोटाळ्याची संपूर्ण व्याप्ती हाती लागू शकलेली नाही

- त्यामुळे राज्य सहकार कायदा कलम 80 अंतर्गत कारवाई करण्याचा स्वतंत्र प्रस्तावही सहकार विभागाला सादर करण्यात आला

पुढील बातमी
इतर बातम्या