अभिमानास्पद! भारतीय खेळाडूची कोरोनाच्या संकटात अनोखी देशसेवा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
आंतरराष्ट्रीय स्तरावर यॉचिंग खेळात नामकिंत स्पर्धकांना हरवत डॉ.श्वेता शेरगावकर हिने भारताला सेलिंग या खेळात रौप्य पदक मिळवून दिले होते. आतामाञ देशावर ओढावलेल्या कोरोना संकटावर मात करून विजय मिळवण्यासाठी श्वेेेता पून्हा मैदानात उतरली आहे. पेशाने डाँक्टर असलेली श्वेता दक्षिण मुंबईतल्या माझगाव, भायखळा, गिरगाव, कुलाबा परिसरात नागरिकांची तपसणी करून त्यांना कोविड19 संदर्भात मार्गदर्शन करत आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा आणि डाँक्टरांची संख्या कमी भासू लागल्याने मुख्यमंञी उद्धव ठाकरेंनी तरुणांना कोरोना पीडितांच्या सेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन करताच. डाँ श्वेता यांनी आपले डाँक्टरकीचे कपडे अंगावर चडवत देशसेवेसाठी पुढे आल्या आहेत. डॉ. श्वेता शेरवेगार यांनी नुकतीच वैद्यकीय शास्त्रातील बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. प्रत्यक्षात काम सुरू करण्याआधीच कोरोना ने थैमान घातले. संसर्ग वाढल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला. हा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने  शिक्षित डॉक्टरांना ही सेवा देण्याचे आवाहन केले. त्यानुसार डॉ.श्वेता यांनी देखील कोरोना संसर्गाच्या निमित्ताने लोकांना सेवा देण्याचे ठरवले. श्वेता यांनी सध्या दक्षिण मुंबईतील माझगाव, भायखळा,गिरगाव ते थेट कुलब्यातील काही परिसरात गरजू नागिरकांची तपासणी सुरू केली. गेल्या १५ दिवसांपासून त्या लोकांची अहोरात्र सेवा करत आहेत.

डाॅ.श्वेता शेरवेगार २०१८ साली आशिया क्रिडा  स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करीत याँचिंग क्रिडा प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. यासह अनेक स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले असल्यामुळेच  महाराष्ट्र सरकारने यंदाचा राज्याचा सर्वोत्कृष्ठ पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवछञपती पुरस्काराने श्वेेेताला गौरवले
 होते. देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी ती डाॅक्टरी पोशाख परिधान करीत कोविड योद्धा म्हणून लढत आहे. 
पुढील बातमी
इतर बातम्या