मध्य (central railway) आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी पहिली वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेन एप्रिलमध्ये नवीन रेल्वे वेळापत्रक लागू झाल्यावर सुरू होऊ शकते.
सध्या, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर एसी लोकल आहेत, परंतु हार्बर मार्गाच्या सीएसएमटी (csmt)-गोरेगाव कॉरिडॉरवर एकही नाही आहे. म्हणूनच मध्य रेल्वे अधिकारी त्यावर तपशीलवार काम करत आहेत.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते, सीएसएमटी-गोरेगाव (goregaon) मार्गावर नवीन एसी लोकल (AC local) सुरू झाली तर दररोज या मार्गावर 100 हून अधिक रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
"हार्बर मार्गावरील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, आम्ही काही नॉन-एसी ट्रेन सेवा बदलण्याचा प्रस्ताव तयार करत आहोत. तथापि, याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही," असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने संयुक्तपणे याला मान्यता दिली तर 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या वेळापत्रकात नवीन एसी लोकलचा समावेश होऊ शकतो.
सध्या वाशी आणि पनवेलकडे जाणाऱ्या प्रत्येक दोन किंवा तीन गाड्यांमागे सीएसएमटी-वांद्रे-गोरेगाव ट्रेन आहे.
रेल्वे सूत्रांनी सांगितले की, या मार्गावर दररोज 3,00,000 ते 5,00,000 प्रवासी असले तरी एसी लोकलला मंजुरी देण्यातील समस्या ही सेवांमधील अंतर असू शकते. कारण प्रत्येक रेक दररोज फक्त 12-14 सेवा चालवू शकेल.
प्रतीक्षेत असलेल्या नवीन एसी रॅक व्यतिरिक्त, सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावर 14 एसी लोकल सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत.
सीएसएमटीच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर चालवल्या जाणाऱ्या 94 एसी सेवांचा हा एक भाग आहे.
अलिकडेच, एसी लोकलमध्ये प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, सीएसएमटी अधिकाऱ्यांनी हार्बर मार्गावर एसी आणि नॉन-एसी दोन्ही गाड्यांमध्ये 50 परवानाधारक विक्रेत्यांची नियुक्ती केली, ज्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास झाला.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान, तिकीट तपासणी पथकांनी हार्बर मार्गावरील एसी लोकलमध्ये अनियमित प्रवासाचे 810 प्रकरणे शोधून काढली आणि त्यांना दंड केला, ज्यातून 2.50 लाख रुपये दंड वसूल केला.
तसेच त्यांनी सीएसएमटी-पनवेल मार्गावरील सर्व 14 दैनंदिन सेवांसाठी एसी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची एक समर्पित टीम तयार केली.
या टप्प्यात, प्रवासी संख्येतही वाढ झाली, 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान या मार्गावर सरासरी 40,017 प्रवासी प्रवास करत होते.
हेही वाचा