मयुर शेळके ५० हजारांतील अर्धी रक्कम अंध महिलेला देणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेनं पुन्हा एकदा उदारपणा दाखवला आहे. मयुरला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट (Sangeeta Shirsat) यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून मिळणाऱ्या ५० हजारांपैकी २५ हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे.

मयुर शेळके याने अवघ्या काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचवला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होऊ लागला. रेल्वे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच त्याचं कौतुक केलं.

रेल्वेकडून त्याला पन्नास हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं. लवकरच ही रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. याशिवाय जावा कंपनीनंही मयुर शेळकेला बाईक भेट म्हणून दिली.

सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगानं एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांतानं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला.


हेही वाचा

रेल्वेच्या 'त्या' शूर कर्मचाऱ्याला जावा कंपनीकडून ही खास भेट

पुढील बातमी
इतर बातम्या