पुणे वेधशाळेनं वर्तवली पावसाची शक्यता

Raj Singh Arora via Twमुंitter
Raj Singh Arora via Twमुंitter
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या हवामान विभागानं (Mumbai Meteorological Department) राज्यातल्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. १९ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम आणि मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेनं दिलाय.

हवामान विभागानं गुरुवारी संध्याकाळी एक अलर्ट (alert) जारी केलं आहे. त्यानुसार, राज्यातल्या ३ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊसाचा इशारा दिला आहे (Thunderstorm with lightning).

दरम्यान मुंबईतील काही भागात गुरुवारी पावसानं हजेरी लावली आहे. विलेपार्ले, मालाड इथं पावसाला सुरुवात झाली. तसंच पनवेल खारघर परिसरात पाऊस पडला. नवी मुंबईतदेखील पावसानं जोरदार हजेरी लावली.

हवामान विभागाच्या मते, वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. कोल्हापूर, (Kolhapur) सांगली (Sangli) आणि सातारा (Satara) या पश्चिम महाराष्ट्रातील (West Maharashtra) ३ जिल्ह्यांसाठी हा अलर्ट आहे.

दरम्यान, हवामान विभागानं याआधीही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार, गुरुवारपासून राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय.

फेब्रुवारीत अचानक पावसानं हजेरी लावल्यानं मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत. मुंबईकरांनी पावसावर चांगलेच मिम्स ट्विटरवर शेअर केले आहेत.  


पुढील बातमी
इतर बातम्या