परतीच्या पावसाचा मुंबईकरांना फटका?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत ऑक्टोबर हिटची चाहूल लागली आहे. एकिकडे ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. तर दुसरीकडे राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ३-४ दिवसांमध्ये मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे. सध्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासास हवामान अनुकूल असलं तरी हवामानात होणाऱ्या चढ-उतार आणि बदलांचा मुंबईकरांना मात्र फटका बसणार आहे.

उकाडा वाढणार

हवामान खात्यानुसार, मुंबईत हवामान कोरडेच राहिल. मात्र काही भागात हलक्या सरी बरसतील. चक्रवाती परिस्थितीमुळे ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हवेतील आद्रतेत भर पडून आणखी उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

राज्याचा अंदाज

८ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ९ ते १० ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक पाऊस पडेल. ११ ऑक्टोबरला देखील कोकण, गोव्यात, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या