हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात आठ जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकणातील रायगड आणि रत्नागिरीसह, पुणे घाटमाधा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि खूप महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
तीन जिल्ह्याना ऑरेन्ज अलर्ट
राज्यात यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र आणि पश्चि महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव आणि विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला. या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील पाच दिवस अतिशय महत्त्वाचे
महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहे. हवामान विभागाने राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावासाच इसारा देण्यात आला आहे. शुक्रवारी मुंबईसह राज्यातील 18 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरीसह पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्याला ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर धुळे, नदूरबार आणि जळगाव वगळता संपूर्ण महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा
राज्यात शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी 21 जिल्ह्यांना अतिमुसळाधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणेसह संपूर्ण कोकण आणि घाटमाथ्याला ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशिवला देखील ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे.
रविवारी देखील 22 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण आणि घाटमाध्याला ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.