मुंबई (mumbai), ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळाला.
हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.
त्यानुसार, नाशिकमध्ये पाऊस पडत आहे. पण वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे नाशिकवरचं ढगफुटीचं संकट हे अकोले आणि पुढे सुरतच्या दिशेला ढकललं गेलं आहे.
पुण्यात घाट परिसरात मुसळधार पावसाचा (heavy rain) अंदाज आहे.
तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता हळूहळू राज्यातील पाऊस ओसरणार आहे.
केवळ विदर्भात पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून आज पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडला आहे.
त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळाली.
यानंतर आता पालघरला पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच त्यानंतर पुढचे काही दिवस पावसाचा ग्रीन अलर्ट असणार आहे.
यामुळे पालघरमध्ये पाऊस ओसरणार असल्याचं चित्र आहे.
ठाणे (thane) जिल्ह्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला बघायला मिळाला.
सलग पाच दिवस पडलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे.
तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं.
पण आता उद्यापासून ठाणे जिल्ह्यात पाऊस ओसरण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज तर उद्यापासून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. पण आता पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत ठराविक ठिकाणी वाऱ्याचा वेग हा 60 ते 70 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता आहे. पण उद्यापासून मुंबईत पाऊस ओसरणार आहे.