विवाहितेला ब्लॅकमेल करून सामुहिक बलात्कार, दिंडोशी परिसरातील धक्कादायक घटना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

उत्तर प्रदेशातच्या हाखरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच, मुंबईत एका विवाहित महिलेला चाकूच्या धाकावर तिच्यावर अत्याचार करून अत्याचाराचा व्हिडिओ वायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकऱणी दिंडोशी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

हेही वाचाः- हॉटेल-रेस्टॉरंटसाठी बीएमसीची नियमावली जारी

दिंडोशी परिसरात राहणारी २२ वर्षीय पीडित महिलेच्या शेजारीच आऱोपी फय्याज शेख हा राहतो. जून २०१८ मध्ये फय्याजने महिलेला घरी बोलवलं होतं आणि चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यावेळी आरोपी फय्याजने महिलेचा व्हिडिओ तयार केला आणि तो मित्र सादिक पटेलच्या मोबाईलवर शेअर केला. यानंतर सादिक पटेल यानेही महिलेला व्हिडिओ दाखवून धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं आणि बलात्कार केला. त्यानंतर दोघांनीही त्यांचा तिसरा मित्र नदीमला व्हिडिओ पाठवला आणि त्यानेही पीडित महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. अखेर रोजच्या या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर दिंडोशी पोलिसात आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या सांगण्यावरून पोलिसांनी  कलम ३७६ (२) एन, ३५४, ३४५ डी, ५०६ (२) आयटी अ‍ॅक्टसहित ६६ ई अंतर्गत गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी दिंडोशी पोलिसांनी फय्याज शेख आणि सादिक पटेल या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांचा मित्र नदीम अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या