...आणि महावितरणाला जाग आली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सह्याद्रीनगर - वीजपुरवठा खंडित होण्याच्या वाढत्या घटनांमुळे भांडुप पश्चिमेकडील सह्याद्रीनगर परिसरातले रहिवासी सोमवारी रात्री रस्त्यावर उतरले. स्थानिक नगरसेविका वैष्णवी सरफरे यांच्या नेतृत्वाखाली रात्री अाठपासून रात्री ११ वाजेपर्यंत रहिवाशांनी सह्याद्रीनगर नाक्यावर आंदोलन करत रस्ता बंद केला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर घटनास्थळी पोहचलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रात्री अडीच वाजेपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण करून विद्युत पुरवठा पूर्ववत केला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'येथील वीजवाहक तारांमध्ये बिघाड झाला असून त्या वीजेचा दाब घेण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना नवरात्रोत्सवापासून सुरू आहेत. याबाबत वारंवार महावितरणकडे तक्रारी केल्या. मात्र नवीन तार न टाकता तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेत होते. सतत तीन दिवस वीज गायब होत असल्यामुळे सोमवारी संध्याकाळी एेन दिवे लागणीच्या वेळीच गेलेली वीज रात्री आठ वाजेपर्यंत परतलीच नाही, हे पाहून संतप्त झालेले रहिवासी रस्त्यावर उतरले.

पुढील बातमी
इतर बातम्या