राज्याच्या 'या' भागांत गुरूवारीही पावसाचा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं बुधवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कांद्यासह आंबा, द्राक्षे, काजू आदी फळपिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

येत्या २ दिवसांत आणखी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनावरही या पावसाचे सावट आहे. थायलंडमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालचा उपसागर व अंदमान समुद्रात आले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ४ डिसेंबरला आंध्रच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे.

२ डिसेंबर : 

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर

३ डिसेंबर :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा. विदर्भातही तुरळक ठिकाणी बरसणार

हा अवकाळी पाऊस ज्वारी व गहू या पिकांसाठी उपयुक्त आहे. काजू, द्राक्षे व आंब्याला बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर बुरशीनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी खात्याने शेतकऱ्यांना केले आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या