जोगेश्‍वरीतील इंदिरा गांधीनगर रहिवाशांना दिलासा

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जोगेश्वरी - रेल्वेच्या हद्दीत वसलेल्या इंदिरा गांधीनगर झोपड्यांचं सर्वेक्षण लवकरच मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल, असं आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसंच राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना दिलंय. मुख्यमंत्री फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या प्रगतीच्या आढावा घेण्यासाठी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात सादरीकरण झालं. इंदिरा गांधीनगर येथील वसाहत 1990च्या आधीपासून रेल्वेच्या हद्दीत आहे. या परिसरातले 120 झोपडीधारक हे महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार आणि निर्णयानुसार संरक्षित आहेत. त्यामुळे कारवाईपूर्वी त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचे होतें. पण ही जागा केंद्र शासनाच्या (रेल्वेच्या) अंतर्गत येत असून त्यांचं पुनर्वसन करण्यास रेल्वे प्रशासन पुढाकार घेत नसल्याची माहिती वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर इथल्या झोपडीधारकांचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे करण्यात येईल. तसे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या