हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार जास्त वेळ सुरू राहणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेस्टॉरंट्स आणि बार (Restaurants and bars) उघडायला परवानगी दिल्यानंतर ग्राहकांचा प्रितिसाद मिळू लागला आहे. ग्राहक आणि हॉटेल मालकांच्या विनंती नंतर सरकारनं आता हॉटेल्स, रेस्टोरंट्स आणि बार उघडे ठेवण्याच्या वेळांमध्ये वाढ केली आहे. आता सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार आहेत. आधी सकाळी ८ ते सायंकाळ ७ अशी वेळ होती.

रेस्टोर्ंट आणि बारच्या वेळा वाढवाव्यात अशी मागणी संबधित व्यवसायिक संघटनांची होती त्यानुसार सरकारनं नवा आदेश काढला आहे. पण असं असलं तरी स्थानिक महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असंही राज्य सरकारनं म्हटलं आहे.

हॉटेल मालकांनी आणि ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारनं याआधीच जारी केल्या आहेत.

  • कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी.
  • लक्षणं नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावं.
  • ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा.
  • खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी.
  • संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत.
  • डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी.
  • रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी.
  • काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे.
  • शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत.
  • शक्य असल्यास दारे – खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा.
  • एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.


पुढील बातमी
इतर बातम्या