कूपरेजमधील बॅण्डस्टॅण्ड होणार चकाचक

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

फोर्ट - मुंबईतील पुरातन वास्तू यादीत येणाऱ्या कूपरेज उद्यानातील बॅण्डस्टॅण्ड वास्तूचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. या बॅण्डस्टॅण्डचा हेरिटेज लूक कायम राखून त्याचं नूतनीकरण आणि कूपरेज उद्यानाच्या सुशोभीकरणावर भर दिला जाईल.

महापालिकेच्या ए विभागातील बॅण्डस्टॅण्ड वास्तू ही फोर्ट पुरातन परिसीमेमध्ये असून, ती मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहे. हे बॅण्डस्टॅण्ड पूर्णपणे सागवानी लाकडाचं आहे. जोत्याचं बांधकाम बसॉल्ट दगडाचं असून, बैठक व्यवस्था बीड या धातूपासून केलेली आहे आणि छप्पर मंगलोरी कौलांचं आहे. ही वास्तू जीर्ण तसेच खराब झाल्यामुळे तिचं नूतनीकरण करून गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली.

अष्टकोनी कमानबद्ध वास्तू असलेल्या या बॅण्डस्टॅण्डचे सागवानी लाकूड खराब झालं आहे. पाया कमकुवत झाला आहे. त्याला रंगरंगोटी केल्यामुळे विद्रुपता आली आहे. त्यामुळे या वास्तूचं संरक्षण तसंच जतन करण्याचा निर्णय झालाय. त्यासाठी कॉन्झव्हॅटर्स या संस्थेची निवड करण्यात आल्याचंही फणसे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या