विसावा नदीजवळचा रस्ता खचल्याने नागरिकांकडून बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील महाड परिसरातील विसावा नदीजवळ नव्याने बांधलेल्या रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी कोसळल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तसेच ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

MIDC कडून महाडमध्ये येताना हॉटेल विसावा इथे सर्विस रोडची संरक्षक भिंत वाहून गेली. त्यामुळे सर्व्हिस रोड खचला आहे. नागरिकांनी सर्व्हिस रोडने येताना वाहन सावकाश चालवावे असे आवाहन करण्यात येत आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या