Dahihandi 2022: दहीहंडीसाठी दादरमध्ये आज रस्त्यांवर निर्बंध, ‘हे’ मार्ग बंद

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

उत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी मध्य मुंबईत आज वाहनांसाठी रस्त्यावरील निर्बंध जाहीर केले आहेत. गुरुवारी पोलिसांच्या पथकांनी रानडे रोडसह दादरमधील (Dadar road Close today) काही रस्त्यांवर बेकायदेशीरपणे पार्क केलेली वाहने उचलली.

यंदा सर्व निर्बंधमुक्त दहीहंडीचा उत्सव पार पडणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे दहीहंडी उत्सवाला परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा मोठ्यासंख्येने आणि उत्साहाने दहीहंडी सण साजरा होणार आहे. या उत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या मार्गांवर निर्बंध घालण्यात आलेले आहे.

दादरमध्ये काही मार्ग बंद करण्यात आलेले आहे. जाणून घेऊया कुठकुठले मार्ग आज बंद राहतील.

  • पनेरी जंक्शन ते दादर पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंत रानडे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.
  • डा सिल्वा रोड विसावा रेस्टॉरंट ते दादर पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.
  • कबुतरखाना ते दादर पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंत एमसी जावळे रोड वाहतुकीसाठी बंद राहील.
  • नवीन प्रभादेवी रोड धनमिल नाका ते अप्पासाहेब मराठे रोड वाहतुकीसाठी बंद राहील.
  • राजाभाऊ देसाई मार्ग प्रभादेवी नाका ते आप्पासाहेब मराठे रोड वाहतुकीसाठी बंद राहील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल 18 ऑगस्ट रोजी ‘दही-हंडी’ हा आता राज्यात अधिकृत खेळ म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा केली आहे. राज्यात ‘प्रो-दही-हंडी’ स्पर्धा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जन्माष्टमीनिमित्त बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रातील क्रीडा प्रकारांतर्गत ‘दही-हंडी’ला मान्यता मिळणार आहे. ‘प्रो-दही-हंडी’ सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय ‘गोविंदांना’ क्रीडा प्रकारांतर्गत नोकऱ्या देखील मिळणार आहेत. तसेच सर्व गोविंदांसाठी ₹10 लाखांचे विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या