IPL 2020: रोहितचा ५ हजार धावांचा टप्पा पार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आयपीएलच्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ४८ धावांनी दणदणीत विजय झाला आहे. मुंबईनं ठेवलेल्या १९२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला १४३/८ पर्यंतच मजल मारता आली. दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या २ धावांची गरज होती. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

मुंबईकडून क्विंटन डीकॉकसोबत सलामीला आलेल्या रोहितनं २ धावा पूर्ण करत हा मैलाचा दगड पार केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यात रोहितला हा विक्रम पूर्ण करण्याची संधी होती. परंतू ८ धावांवर बाद झाल्यानं त्याचा हा विक्रम लांबवणीवर पडला.

विराट कोहली आणि सुरेश रैना या दोन भारतीय फलंदाजांना आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणं जमलं आहे. या दोन्ही फलंदाजांनंतर अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा फलंदाज ठरला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या