जास्तीचे भाडे उकळणाऱ्या रिक्षांवर होणार कारवाई, 'या' क्रमांकावर करा तक्रार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कल्याण डोंबिवली आरटीओनं जास्तीचे भाडे उकळणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. प्रवाशांच्या तक्रारीकरीता कल्याण डोंबिवली आरटीओनं व्हॉटसअप नंबरही अंमलात आणलाय.

कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी कल्याण आरटीओला (Kalyan Dombivli RTO Office) प्राप्त झाल्या होत्या. प्रवाशांची लूबाडणूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली जात नाही अशी तक्रार केली जात होती.

गेल्या वर्षभरापूर्वीच मीटरचे प्रवासी भाडे जाहीर करण्यात आले आहे. मात्र शेअर प्रवासी भाडे जाहिर केलेले नव्हते. हे शेअर प्रवासी भाडे जाहीर करण्यात आले. मीटर प्रमाणे चालणाऱ्या रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे द्यावं.

तसंच ठरलेल्या शेअर भाडय़ा प्रमाणे रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून प्रवासी भाडे घ्यावे. जास्तीचे प्रवासी भाडे घेतल्यास संबंधित रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई केली जाईल. प्रवासी रिक्षा भाडय़ा संदर्भात प्रवाशांना काही तक्रारी असल्यास त्यांनी ९४२३४४८८२४ या व्हॉटस्अप नंबर संपर्क साधावा असं आवाहन आरटीओकडून करण्यात आलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या