म्हणून आरटीओ देणार रिक्षा चालकांना प्रशिक्षण

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • सिविक

शहरातील रस्ते अपघातात अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी होतात, तर अनेकांना तातडीने उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. मृत्यूचं हे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओने मुंबई उपनगरातील रिक्षा चालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याला त्वरित उपचार मिळण्यासाठी आरटीओ रिक्षा चालकांना प्रशिक्षण देणार आहे.

यांनी केलं आयोजन

खरंतर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनेच या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येत आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील सर्व राज्यांत रस्ते अपघातांमुळे प्रवासी जखमी होण्याचं आणि मृत्यू पावण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. आम्ही हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून रस्ते सुरक्षा पंधरवाड्यात याला प्राथमिकता दिली आहे.

या अभियानादरम्यान कमीत कमी 60 रिक्षाचालकांनी या कार्यक्रमात भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या