पेंग्विन पाहण्याकरता गर्दीच गर्दी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भायखळा - राणीबागेतील पेंग्विनचे दर्शन अखेर मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पेंग्विन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर शनिवारपासून नागरिकांना मोफत पेंग्विन दर्शन खुले करण्यात आले आहे.

शनिवारी पहिल्याच दिवशी दहा हजार नागरिकांनी पेंग्विन पहाण्यासाठी राणीबागेत हजेरी लावली होती. तर, रविवारी तब्बल वीस हजार नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे उद्यान प्रशासनाने काही वेळासाठी पेंग्विन कक्ष बंद केला होता. मात्र लोकांच्या लांबच लांब रांगा पाहून पेंग्विन कक्ष पुन्हा खुला करण्यात आला. 31 मार्चपर्यंत पेंग्विन दर्शन मोफत असल्याने अनेक नागरिक या संधीचा लाभ घेत आहे. त्यानंतर मात्र पेंग्विन पाहण्यासाठी प्रौढांना 100 रुपये आणि लहान मुलांसाठी 50 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या