राज्यातील (maharashtra) पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी (blue flag) प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षा ऑडिटची प्रक्रिया सुरू आहे.
तसेच यातील तीन समुद्रकिनाऱ्यांचे (coastal area) ऑडिट पूर्ण झाले असून, दोघांची प्रक्रिया सोमवार 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
राज्यातील लाडघर, गुहागर, श्रीवर्धन, नागाव आणि पर्णका (डहाणू ) या पाच समुद्रकिनाऱ्यांची निवड ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी करण्यात आली आहे. त्यानुसार या समुद्रकिनाऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा ही देण्यात आला आहे.
मात्र, ‘ब्ल्यू फ्लॅग’च्या अंतिम नामांकनासाठी या पाचही समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. त्यानुसार काही दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
सोमवार 27 ऑक्टोबर पासून नागाव बीचचे सुरक्षा ऑडिट केले जाणार आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबरपासून पर्णका (डहाणू ) या समुद्रकिनाऱ्याचे सुरक्षा ऑडिट सुरू केले जाणार असल्याचे समजते.
या सुरक्षा ऑडिटमध्ये या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येते. यात प्रामुख्याने सेफ स्विमिंग झोन निश्चित करून त्यांचे मार्किंग करण्याचे काम केले जाते.
याशिवाय या समुद्रकिनाऱ्यांवर पुरेशा जीवरक्षकांची नेमणूक करणे, समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचण्यासाठी आवश्यक सोईसुविधा आहेत का? हे तपासण्यात येत आहेत.
या पाचही समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाल्यानंतर ‘ब्ल्यू फ्लॅग’च्या अंतिम नामांकनाचा प्रवास सुरू होणार आहे. सुरक्षा ऑडिटचा अहवाल पूर्ण केल्यानंतर साधारण जून-जुलै महिन्यात यासंदर्भातील अंतिम घोषणा केली जाऊ शकते.
या महिनाअखेर म्हणजे 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यभर पाऊस (heavy rain) कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा