समीर वानखेडेंच्या नवी मुंबईतील हॉटेल-बारला दिलेला परवाना रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मालकीच्या सद्गुरु हॉटेल आणि बारला दिलेला परवाना रद्द करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांचं हे हॉटेल आणि बार नवी मुंबईत असून, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी हा परवाना रद्द केला.

मिळालेल्या माहितीनुसार, समिर वानखेडे यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन आणि फसवणूक करून तो मिळवला होता, असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

ठाणे उत्पादन शुल्क अधीक्षक आणि वानखेडेंच्या वकिलांचं म्हणणं ऐकल्यानंतर नार्वेकर यांनी वाइन, स्पिरीट आणि मद्य विक्रीसाठी परवानगी दिलेल्या हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा ६ पानी आदेश दिला. वानखेडेंना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी परवाना मिळवल्याचं आढळून आलं.

२१ वर्षांच्या पात्रतेच्या तुलनेत त्यांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी होतं, त्यामुळं त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. बारचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदी कायद्याचे कलम ५४ लागू केलं आहे.

NCP च्या नवाब मलिकांनी हे प्रकरण महासंचालक, NCB, CVC आणि राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडं नेलं होतं. मलिकांनी दोन मुद्दे उपस्थित केले होते. अखिल भारतीय सेवेचा सदस्य स्वत:चा व्यवसाय करू शकतो का आणि वानखेडेंना परवाना दिला, त्या दिवशी ते अल्पवयीन असतानाही त्यांनी परवाना कसा मिळवला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या