वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी पुन्हा सरसावला अफरोझ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणारे युनायटेड नेशन पुरस्कार विजेते अफरोझ शाह यांनी पुन्हा एकदा या चौपाटीच्या स्वच्छतेची कमान सांभाळली आहे. शनिवारी ‘स्वच्छ वर्सोवा किनारा’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या मोहिमेत वर्सोवा किनारा स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाग घेतला होता.

पुन्हा राबवली स्वच्छता मोहीम

मुंबईतील अंधेरी येथील वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी अफरोझ शाह यांनी पुढाकार घेत याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली. पण ही स्वच्छता मोहीम राबवताना स्थानिकांकडून होणारे असहकार्य आणि कोणतीही मदत न मिळाल्याने कंटाळून त्यांनी ही मोहीम बंद केली होती. त्यानंतर महापालिकेने आपली सर्व यंत्रणा याठिकाणी कामाला लावण्याचा निर्णय घेतला होता. पण दरम्यान अफरोझ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छतेची मोहीम राबवण्याचा निर्धार केला होता.

'आता स्वच्छतेचं काम सुरू राहिल'

त्यानुसार अफरोझ शाह यांनी ‘‘स्वच्छ वर्सोवा किनारा’’ मोहीम सुरु केली. शनिवारी राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सहभागी होऊन स्वच्छतेबाबत आणि पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यास हातभार लावला. यापुढे वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेचे काम पुढे सुरू राहिल, असं अफरोझ यांनी म्हटलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या