अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईतल्या (mumbai) विविध हॉटेल्सवर आणि रेस्टॉरेंट्सवर धडाधड धाड टाकत भेसळखोरांच्या मनात धडकी भरवली आहे.
इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई महापालिकेच्या (bmc) शाळांमधील कँटीनमध्ये मिळणाऱ्या मेन्यूतून वडा-पाव, समोसा, कोला हे विकणं बंद केलं आहे. त्याऐवजी वेगळ्या पदार्थांचा मेन्यूमध्ये समावेश केला आहे.
मुंबईसह राज्यभरातल्या शाळांच्या (schools) 50 मीटरच्या परिघात कुठलेही कॅलरी वाढवणारे किंवा पिण्यास अयोग्य, घातक असे पदार्थ, पेयं विकली जाऊ नयेत अशा आदेशांची अंमलबजावणी तुकाराम मुंढेंनी केली.
तसंच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक या सगळ्यांनीच असं काही घडत असेल तर तक्रार करा असं आवाहन केलं. ज्यानंतर आता तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) या निर्णयाचा परिणाम मुंबईतल्या शाळांवर पाहण्यास मिळतो आहे.
मुंबईतल्या शाळांमधल्या कँटीनमध्ये (school canteen menu) आता वडा-पाव, समोसा, कोला या ऐवजी इडली, पोहे, डोसा, शिरा आणि उपमा हे पदार्थ मिळू लागले आहेत. तसंच शीतपेयांची जागा ही ताक आणि लस्सीने घेतली आहे.
शाळांच्या परिसरात जंक फूड, तत्सम शीतपेयं, घातक द्रव्यं असलेली पेयं विकू नयेत असे आदेश FDA ने अर्थात तुकाराम मुंढेंच्या विभागाने काढले. ज्यानंतर हा बदल पाहण्यास मिळाला आहे.
मुलांना सुरक्षित अन्न आणि समतोल आहार दिला गेला पाहिजे हा नियम 2020 चा आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरु झाली आहे. ज्यानंतर मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधला मेन्यू बदलला आहे.
हेही वाचा