'नाथजल'ची विक्री न केल्यास परवाना रद्द - एसटी महामंडळ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळानं आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतली. यामधील एक म्हणजे प्रवासी सेवेसह एसटी महामंडळानं 'नाथजल' बाटलीबंद पाण्याची व्रिक्रीचा सुरू केले होता. परंतू, एसटी आगारातील उपहारगृहचालक, दुकानदार 'नाथजल'ची विक्री करत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामळं एसटी महामंडळानं या उपहारगृहचालक, दुकानदारांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. 'नाथजल'ची विक्री केली नाही तर परवाना रद्द करण्याचा इशारा महामंडळानं दिला आहे.

सध्या एक लिटर बाटलीबंद पाण्याची मूळ किंमतीतच व्रिक्री करण्याच्याह सूचना केल्या आहेत. दिड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महामंडळाची बाटलीबंद पाणी व्रिक्रीची योजना नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात आली. 'नाथजल' नावानं या पाण्याची व्रिक्री एसटी आगार, स्थानकातील उपहारगृह, दुकान व अन्य आस्थापनात केली जाते. एक लिटर बाटलीबंद पाणी १५, तर ६५० लिटर १० रुपये असे दर आहेत.

पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, सातारा,अहमदनगर, सोलापूर या विभागात विक्री सुरू झाली. इथं दररोज ६ हजार पाण्याच्या बाटल्यांची व्रिक्री होत असल्याचं समजतं. उपहारगृहचालक, दुकानदारांनी फक्त नाथजलचीच व्रिक्री करावी. दुसऱ्या कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची व्रिक्री न करण्याच्या सूचना आहेत. तसं केल्यास त्याचा परवाना रद्द होणार आहे.

अन्य कंपन्याचे बाटलीबंद पाणी एका महिन्यात संपवण्याचेही आदेश आहेत. याशिवाय १५ रुपये बाटलीबंद पाण्याची व्रिक्री चढ्या दरानं केल्यासही परवाना रद्द केला जाणार आहे. सध्या महामंडळाच्या बसस्थानकांवर अनधिकृत बाटलीबंद पाण्याची व्रिक्री करणाऱ्या फिरत्या परवानाधारकांचाही सुळसुळाट आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं अनधिकृतपणे पाण्याची व्रिक्री करणाऱ्या परवानाधारकांबाबत कार्यवाही केली जाणार आहे.

सध्या एक लिटर नाथजल बाटलीबंद पाण्याचीच विक्री होत आहे. ६५० लिटलच्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीसाठी स्वतंत्रपणे शासनाची मंजुरी लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या