Hi पाठवा आणि मेट्रोची तिकीट बुक करा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांसाठी (mumbai) बहुप्रतिक्षित असलेली मुंबई मेट्रो लाईन 3 (Aqua Line) गुरुवारी प्रवाशांसाठी सुरू झाली. मात्र, सुरुवातीच्या काही तासांतच अनेकांना ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये अडचणी येऊ लागल्या.

या समस्येवर तोडगा म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (mmrc) ने प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगचा सोयीस्कर पर्याय सुरू केला आहे, तो म्हणजे WhatsApp द्वारे तिकीट बुकिंग!

आता प्रवाशांना रांगेत उभं राहायची गरज नाही. मुंबई मेट्रो 3साठी तिकीट थेट WhatsApp वरून बुक करता येईल.

MMRC ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये QR कोड आणि WhatsApp नंबर दिला आहे. याद्वारे फक्त एक Hi मेसेज पाठवून प्रवासी सहज तिकीट बुक करू शकतात.

MMRC ने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना व्हॉट्सॲप क्रमांक +91 9873016836 वर तिकीट बुक करता येणार आहे. या सोबत एक QR कोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Whatsapp क्रमांक आणि QR कोडद्वारे पुढीलप्रमाणे तिकीट बुक करता येईल -

1. दिलेल्या क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवा किंवा QR कोड स्कॅन करा.

2. चॅटबॉट तुमचं स्वागत करून पर्याय दाखवेल.

3. तिथे Buy Ticket पर्याय निवडा.

4. प्रवासाचे तपशील भरा, सुरुवातीचे आणि शेवटचे स्टेशन, प्रवाशांची संख्या (कमाल 6 पर्यंत) तसेच सिंगल किंवा रिटर्न तिकीट पर्याय निवडा.

5. दिलेल्या माहितीचा तपशील तपासा आणि Confirm करा. आवश्यक असल्यास Edit Your Journey वर क्लिक करून बदल करू शकता.

6. दिलेली माहिती योग्य असेल तर Pay Now वर क्लिक करा, त्यानंतर तुम्ही आपोआप Zapkey पेजवर जाल, जिथे UPI किंवा कार्डद्वारे पेमेंट करता येईल. पेमेंट पूर्ण करण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ मिळेल.

7. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर ताबडतोब मोबाईलवर QR तिकीट प्राप्त होईल, जे मेट्रो स्टेशनवर स्कॅन करून प्रवेश करता येईल.

Whatsapp शिवाय प्रवाशांना मेट्रो कनेक्ट 3 आणि मेट्रो वन या अ‍ॅप्सद्वारेही तिकीट बुक करता येतात. दोन्ही अ‍ॅप्स Google Play Store आणि Apple iOS वर उपलब्ध आहे. तसेच तिकीट आणि पास बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.

मात्र, मेट्रो लाईन 3 चा नवीन टप्पा या अ‍ॅप्समध्ये अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई मेट्रो व्यवस्थापनाने तिकीटिंग पूर्णपणे डिजिटल करण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे.

लाईन 2A आणि 7 साठी आधीच WhatsApp तिकीटिंगची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी 8652635500 हा नंबर आहे.


हेही वाचा

माहीममध्ये सी फूड प्लाझा सुरू होणार

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच लष्करी प्रशिक्षण सुरू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या