किमान उद्यानांची तरी काळजी घ्या

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

धारावी - धारावीत वेस्टर्न इंडिया नावाने प्रसिद्ध असलेल्या मैदानाचं सुशोभीकरण करून दोन वर्षांपूर्वी ते नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. या उद्यानाला हुतात्मा अब्दुल हमीद पार्क असं नाव देखील देण्यात आलं. पण, सध्या या उद्यानाच्या सुरक्षिततेकडे आणि देखभालीकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे.

संत रोहिदास मार्गावर अर्थात धारावीतील मुख्य रस्त्यावर वेस्टर्न इंडिया टेनरीस नावाची लेदर बनवण्याची मोठी कंपनी होती. कंपनी बंद पडल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेचा वापर स्थानिकांकडून मैदान म्हणून होऊ लागला. काही एकर असलेल्या जागेवर स्थानिक गाड्या देखील पार्क करत असल्यामुळे मुलांना खेळता येत नाही. उद्यानात नागरिकांना सकाळी 6-10 आणि सायंकाळी 4-8 या वेळेत प्रवेश दिला जातो. या उद्यानातील विजेचे दिवे गायब आहेत. उद्यानाच्या नामफलकाचीही दुरवस्था झालेली आहे.

याविषयी स्थानिक नागरीक सलीम पटेल म्हणाले की जे पार्क एका हुतात्मा व्यक्तीच्या नावाने सुरु करण्यात येते, त्यावर तरी किमान महापालिकेने लक्ष देऊन स्वच्छता आणि व्यवस्था ठेवावी अशीच अपेक्षा आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या