'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये निघाली भरती

  • राजश्री पतंगे & नितेश दूबे
  • सिविक

जहाजात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवकांसाठी खूशखबर आहे. कारण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एससीआय) मध्ये 50 पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये पोर्ट मॅनेजर, डेप्युअर पोर्ट मॅनेजर या जागांचा समावेश असून यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्जासाठी काय कराल? 

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी पात्र उमेदवारांसाठी 30 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखती आयोजित केल्या आहेत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीसाठी अर्ज करता येईल. shipindia.com ला भेट देऊन देखील अर्ज भरता येणार आहे. यामधील पात्र उमेदवारांना 30 ऑगस्ट रोजी मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.

'येथे' होईल मुलाखत

शिपिंग हाऊस, द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, 245, मॅडम कामा रोड, मुंबई -400021 या ठिकाणी उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. अधिक माहितीसाठी http://www.shipindia.com/careers/fleet-personnel.aspx वर क्लिक करून माहिती मिळवू शकता.

पुढील बातमी
इतर बातम्या