मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदला - शिवसेना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - स्थानिक नागरिकांची इच्छा लक्षात घेवून मुंबईतल्या सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी स्थानकांची नावे बदलण्याची मागणी लोकसभेत केली आहे. यामध्ये पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गावरील स्थानकांचा समावेश आहे.

या स्थानकांची नावे बदलण्याची मागणी
पश्चिम रेल्वे मार्गावरील
चर्नी रोड स्थानकाला गिरगाव स्थानक नाव देण्याची मागणी
मुंबई सेंट्रलला नाना शंकर शेठ नाव देण्याची मागणी
एलफिन्स्टन स्टेशनला प्रभादेवी नाव देण्याची मागणी
मध्य रेल्वे मार्गावरील
करी रोड स्टेशनचं नाव लालबाग करण्याची मागणी
सँडहर्स्ट रोड स्थानकाचं नाव डोंगरी करण्याची मागणी
हार्बर रेल्वे मार्गावरील
कॉटन ग्रीन स्टेशनचं नाव काळाचौकी करण्याची मागणी
रे रोड स्थानकाचं नाव घोडपदेव स्टेशन करण्याची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या