शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा सुवर्ण महोत्सव

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिवाजी पार्क - दादरच्या शिवाजी पार्कमध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली. सुवर्णमहोत्सवानिमित्त पुतळ्याचा परीसर फुलांनी सजवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती मुंबईच्या वतीनं ही भव्य सजावट करण्यात आलीय.

शिवाजी पार्क हे 1925 मध्ये मुंबई महानगरपालिकेनं जनतेसाठी खुले केले. शिवाजी पार्कचं मूळ नाव माहिम पार्क असं होतं. त्यानंतर या मैदानावर एका बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा 6 नोव्हेंबर 1966 मध्ये उभारण्यात आला. तेव्हापासून या पार्कला शिवाजी पार्क नावानं ओळखलं जाऊ लागलं. शिवाजी महाराजांच्या या भव्य अश्वारुढ पुतळ्यामुळे या पार्कची वेगळी ओळख निर्माण झाली. हा पुतळा कासेचा आहे. लालबागच्या राजाचे मुर्तीकार संतोष कांबळी यांनी पुतळ्याला मेटलिक ब्रॉंझची झळाळी दिलीय. 

पुढील बातमी
इतर बातम्या