भाजीविक्रेते महापालिकेवर नाराज

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - महापालिकेनं गोरेगाव पश्चिमेकडे नवीन टोपीवाला मार्केट आणि नाट्यगृह बनण्यासाठी निविदा काढल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी सुनील प्रभू यांनी इथं मार्केट आणि नाट्यगृह बनवण्याला मंजुरी दिली होती. मात्र तिथल्या 206 दुकानदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न होता.

पालिकेनं मार्केटच्या समोरच संक्रमण शिबीर बांधलंय. पण त्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. सध्या या शिबिरात पालिकेेनं 5 बाय 5 चे 190 गाळे तयार केलेत. पण हे गाळे कमी असून विजेचं कामही पूर्ण झालेलं नाही. त्याचबरोबर या मार्केटमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी जागा फारच कमी असल्याचं भाजी विक्रेता भैरवनाथ प्रजापती यांनी सांगितलं. त्यामुळे दुकानदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

यासंदर्भात पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'रहिवाशांना येथील मार्केटची सवय झाली आहे. तसंच दुसरी जागा उपलब्ध नाही म्हणून महापालिकेला त्याच ठिकाणी संक्रमण शिबीर उभारावं लागलंय.'

पुढील बातमी
इतर बातम्या