अपघात नियंत्रणासाठी स्वाक्षरी मोहीम

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वडाळा - वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वडाळा पूर्व परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून वाहतूक विभागाला लेखी निवेदन दिले आहे.

वडाळा पूर्व येथील वडाळा - आणिक जोड रस्त्यावरील बरकत अली नाका ते गणेश नगर या रहदारीच्या ठिकाणांवर वारंवार अपघात होत आहेत. एका आठवड्यापूर्वी श्रेयस म्हात्रे या नववीतील विद्यार्थ्याला अपघातात जीव गमवावा लागला आहे. परंतु वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाला जागे करण्यासाठी येथील नागरिकांनी शिवमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने शुक्रवारी स्वाक्षरी मोहीम राबवली.

या अपघातांवर नियंत्रण यावे यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभागाला अनेक लेखी निवेदने दिली आहेत. त्याचबरोबर अपघात रोखता यावेत यासाठी विविध उपाययोजना देखील सूचवल्या आहेत. अशाच प्रकारचे स्वाक्षऱ्यांचे निवेदन तयार करून स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस ठाणे येथे देण्यात येणार आहे. "या निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर उपायोजना न झाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल", असा इशारा शिवमुद्रा युवा प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत मोरे यांनी दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या