चेंबूरमध्ये स्कायवॉकची दुरवस्था

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूर - रेल्वे स्थानकात होणाऱ्या गर्दीला पर्याय म्हणून एमएमआरडीएनं कोट्यावधी रुपये खर्च करून चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉक बांधला. मात्र एमएमआरडीएच्या दुर्लक्षामुळे या स्कायवॉकची मोठी दुरवस्था झालीय. स्कायवॉकवरील सर्व लाद्या निघालेल्या आहेत. याशिवाय स्कायवॉकला लावण्यात आलेल्या सुरक्षा पट्ट्या आणि पाईप देखील अनेक ठिकाणी तुटलेत. त्यामुळे स्कॉयवॉकच्याकडेनं जाताना एखाद्याचा तोल गेल्यास तो खाली पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरडीएने तात्काळ याची दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांनी केलीय. गरज नसताना हा स्कायवॉक तयार करून कोट्यवधीचा चुराडा एमएमआरडीएनं केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी कुमार गायकवाड यांनी केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या