गोरेगावकरांचा वाशी पुनर्वसनाला विरोध

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव (प.) - नाला रुंदीकरणात अडचण येत असल्याने गोरेगावच्या आझादनगर येथील 600 झोपड्यांवर पालिकेने तोडक कारवाई केली. तसेच तिथल्या नागरिकांना वाशी आणि चेंबूर येथे पुनर्वसन केले आहे. पण या स्थलांतराला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. काँग्रेसच्या माधवी राणे या नागरिकांच्या मदतीला धावून आल्या. सदर झोपडपट्टीवासीयांना गोरेगावमध्ये एसअारए अंतर्गत होणाऱ्या इमारतीमध्येच घरे द्यावी अशी मागणी करत या लढाईत जेल मध्ये जावे लागले तरी चालेल' असं मत राणे यांनी व्यक्त केले.

 

गेल्या 40-50 वर्षा पासून या ठिकाणी 600 झोपड्या होत्या. त्यामध्ये सुमारे 5 हजार लोक राहतात. पालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये येथील 560 झोपड्या पात्र दाखवून 40 झोपड्या अपात्र दाखवल्या आहेत. या यादीत मोठा गोंधळ असल्याचा आरोप इथले नागरिक करत आहेत. येथील राहणाऱ्या मुलांची शाळा, नागरिकांची नोकरी गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी या ठिकाणी आहे. त्यामुळे गोरेगावातच घरे द्यावी अशी मागणी रहिवासी करत आहेत. पालिका पी दक्षिण विभागातर्फे करण्यात येणाऱ्या झोपड्यांचे स्थलांतराचं काम सोडतीद्वारे शुक्रवारी करण्यात आलं होतं. मात्र वाशी नाका, चेंबूर या ठिकाणी स्थलांतरत करण्यास नागरिक तयार नाहीत.

पुढील बातमी
इतर बातम्या