शिवाजी पार्कात पुन्हा सापाचं दर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या दादर (dadar) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) (shivaji park) पुन्हा एकदा सापच दर्शन झालं आहे. काही दिवसांपूर्वी साप आढळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शिवाजी पार्कात साप आढळला आहे. शिवाजी पार्क येथील स्काऊट हॉलमध्ये सपाचं दर्शन झालं आहे.

धामण जातीच्या बिनविषारी साप असून हा २ फुटांचा आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास हा साप आढळला आहे.

शिवाजी पार्क मैदानात सतत क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसंच, लहान मूलंही क्रिकेट व फुटबॉलच्या सरावासाठी मैदानात येत असतात. त्याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी मैदानात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही जास्त असल्यानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

धामण जातीच्या बिनविषारी सापाला सर्पमित्रांनी पकडलं होतं. त्यानंतर नाग (इंडियन स्पेक्टिकल कोब्रा) पकडला आहे. नाग स्मारकाच्या जागेतून बाहेर पडला आणि समोर असलेल्या स्काऊट आणि गाईड हॉलच्या झुडुपांमध्ये शिरला. या प्रकरणी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पालिका प्रशासनाकडं (bmc) तक्रारही दाखल केली.

पुढील बातमी
इतर बातम्या