डॉक्टर म्हणजे माणसातला देव ! मात्र डॉक्टरांवरच सध्या हल्ले होत आहेत. डॉक्टर हा आधी माणूस आहे, हे सोयीस्करीत्या लोकं विसरतात आणि डॉक्टरांकडून काही चूकच होऊ नये, अशी अपेक्षा देखील ते करतात. डॉक्टरांची कहाणी सांगणारं 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' हे गाणं लोकांसमोर येतंय.
प्रवीण राजा कारळे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केलं आहे. डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. सुनंदा धीवरे या दोन डॉक्टरांनीच हे गाणं लिहीले आहे. तर रोहन पटेल यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. सुरेश वाडकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे.
किमान या गाण्यानंतर तरी लोकांचे विचार बदलतील आणि डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीला आळा बसेल, अशी आशा करायला हरकत नाही