...हेच मुंबईचे खरे हिरो!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला प्रगतीपथावर नेण्यामागे अनेक कष्टकरी हात आहेत. ज्यामध्ये मुंबईचे डबेवाले, टॅक्सी ड्राइव्हर, मुंबई पोलीस, बेस्टचे ड्रायव्हर, मोटरमन, रुग्णालयाचे कर्मचारी, अग्निशमन दलातील कर्मचारी, पालिकेचे सफाई कर्मचारी यांच्यामुळे आज मुंबईने देशभरात आणि जगभरातही आपली छाप टाकली आहे. या सर्वांना सलाम करण्यासाठी मुंबईच्या स्वच्छ हरित शिवाजीपार्क एएलएम, आय लव्ह मुंबई ही सामाजिक संस्था आणि पर्ल अॅकॅडेमी यांच्या वतीने या कष्टकरी मुंबईकरांचे पोस्टर तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर ते सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक स्थळांवरती लावण्यात येतील.

या पोस्टरची थिम 'मुंबई बाय डिझाईन' अशी आहे. हे सर्व पोस्टर 4 फूट X 8 फुटांचे आहेत. पोस्टर रंगवण्याच्या कामात मुंबईकरांचा हातभार लागावा यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा ठेवण्यात आली आहे. यापैकी पहिली कार्यशाळा दादरच्या शिवाजी पार्क येथील नाना-नानी पार्कजवळ शनिवारी 6 मे रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत आयोजित करण्यात आली होती. स्वच्छ हरित शिवाजी पार्क एएलएम आणि पर्ल अॅकॅडेमीकडून ही कार्यशाळा आयोजित केली गेली होती. याला शिवाजी पार्कमधील नागरिकांनी भर-भरून प्रतिसाद दिला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत देखील उपस्थित होत्या.

मुंबईचे श्रमिक हेच खरे हिरो आहेत आणि त्यांच्यामुळेच आज मुंबईची प्रगती होत आहे. अशा या श्रमिकांना सलाम


- विशाखा राऊत, नगरसेविका, शिवसेना

दुसरी कार्यशाळा रविवारी 7 मे रोजी वांद्र्याच्या कार्टर रोड येथे संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत आयोजित करण्यात आली. आय लव्ह मुंबई ही सामाजिक संस्था आणि पर्ल अॅकॅडमी यांच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी अभिनेता टॉम अल्टर यांनी हजेरी लावली होती. या संकल्पनेचे सूत्रसंचालन पर्ल अॅकॅडेमीच्या संचालिका रिचा वर्मा यांनी केले.

हिरो म्हणून आज सर्वचजण बॉलिवूडच्या हिरोंकडे पाहतात. पण मुंबईचा कष्टकरी वर्ग हाच खरा हिरो आहे. त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधावे यासाठी नवीन प्रयत्न केला गेला आहे.


रिचा वर्मा, संचालिका, पर्ल अॅकॅडेमी

या श्रमिक कष्टकरी वर्गामुळेच मुंबई कधीच थांबत नाही. या कष्टकरी मुंबईकरांना 'मुंबई लाइव्ह'चा सलाम.

पुढील बातमी
इतर बातम्या