एसटी कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 58 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि राज्य परिवहन ( एसटी ) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी गुरुवारी केली.

मात्र, वेतनवाढीची (salary hiking) थकबाकी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व अन्य मागण्या निकाली न निघाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने 29 जूनपासून राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबई सेंट्रल (mumbai central) येथील वाहतूक भवनमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST workers) मागण्यांबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कामगार संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आर्थिक व प्रशासकीय मागण्यांचा पाढा वाचला. त्यावेळी महागाई भत्ता 53 वरून ५58 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच, भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यास, एसटी कर्मचाऱ्यांनाही तशी वाढ तत्काळ लागू करण्याचे आदेशही प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले.

वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानकांचा विकास, कल्याणकारी योजना आणि महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर सविस्तर चर्चा झाली.

कर्मचारी संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली समिती स्थापन करून उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना देण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह होणाऱ्या स्वतंत्र बैठकीत उर्वरित आर्थिक मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल.

त्याचवेळी घरभाडे भत्त्याची थकबाकीही लवकरच देण्यात येईल. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे’, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.


हेही वाचा

चेंबूर स्थानकाजवळ तार आढळल्याने हार्बर सेवा विस्कळीत

पश्चिम रेल्वेचे 239 डिजिटल ॲक्सल काऊंटर्स तैनात

पुढील बातमी
इतर बातम्या