सरकार घाईघाईनं प्रस्ताव मंजूर करतंय - फणसे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - आचारसंहिता कधीही लागू होणार असल्याची शक्यता असल्याने मुंबईकरांवर भुरळ पाडण्यासाठी कोट्यवधीचे प्रस्ताव घाईघाईने मंजूर केले जात असल्याचा आरोप यशोधर फणसे यांनी केला. स्थायी समितीत मंजूर केले जात असलेल्या प्रस्तावात सत्ताधारी म्हणून शिवसेना किंवा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून माझा कोणत्याही पद्धतीचा सहभाग नसल्याचा खुलासा स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केला आहे.

याबाबतचा खुलासा करताना फणसे यानी सांगितले की, विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रशासन करते. निविदा प्रक्रिया देखील प्रशासनाकडून करण्यात येतात. नंतर ते खर्चाच्या मंजूरीसाठी स्थायी समितीकड़े पाठवले जातात. यापूर्वी समितीमध्ये 40 प्रस्ताव मंजूरीसाठी येत होते. मात्र आता अचानक प्रशासनाने शेवटच्या टप्प्यात सर्व प्रलंबित 70 हून अधिक प्रस्ताव मंजूरीसाठी आणण्याचा घाट घातला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, शालेय वस्तू देण्यासह रस्ते, ब्रिज आणि नालेसफाई यासारख्या प्रस्तावांचा यात समावेश आहे. ते पूर्ण न झाल्यास आमच्यावर टीका होऊ शकते, असे फणसे म्हणाले.

काही प्रस्ताव टेंडर असूनही अनेक महिने समितीसमोर न येता आता सादर करण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच उशिरा आलेल्या प्रस्तावाचा प्रशासनाने खुलासा करावा, असे निर्देशही फणसे यांनी दिले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या