मनसोक्त प्या! ख्रिसमस, थर्टी फर्स्टला हाॅटेल, बार पहाटेपर्यंत खुले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोणत्याही सणांचं 'झिंगाट' सेलिब्रेशन करताना नेहमीच एक पेग कमी पडतो. मग अापला कोटा पूर्ण करण्याकरिता मद्यासाठी शोधाशोध सुरू होते. पण घाबरू नका. या वर्षी ख्रिसमस अाणि थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करताना तुम्हाला मद्य कमी पडणार नाही, याची काळजी सरकारनं घेतली अाहे. २४, २५ अाणि ३१ डिसेंबरला हाॅटेल, बार अाणि पब्स पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली अाहे. तर रात्री १ वाजेपर्यंत वाईन शाॅप सुरू असतील.

पहाटे ५ पर्यंत हाॅटेल, बार, पब सुरू

गृह मंत्रालयानं उत्पादन शुल्क विभागाशी चर्चा करून गुरुवारी या संदर्भातलं परिपत्रक जारी केलं अाहे. त्यानुसार अाता रात्री १०.३० वाजता बंद होणारी वाईन शाॅप्स रात्री १ वाजेपर्यंत सुरू असतील. तसंच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहणारी हाॅटेल, बार, पब अाता ख्रिसमस अाणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

बार, पबमालकांना अद्याप दिलासा नाही

वेळ वाढवण्यात अाली असली तरी बार अाणि पबमालकांना अद्याप पोलिसांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पोलिस महासंचालकांना याबाबत पत्र दिल्याची माहिती हाॅटेल अँड रेस्टाॅरंट असोसिएशन अाॅफ वेस्टर्न इंडियातर्फे दिली अाहे.

प्रत्येक वर्षी सणासुदीच्या दिवसांसाठी परवानगी मिळवण्याकरिता अाम्हाला उत्पादन शुल्क विभाग अाणि गृह विभागाला बराच त्रास द्यावा लागतो. या वर्षी सुदैवाने अाम्हाला ख्रिसमसच्या तीन दिवसअाधीच परवानगी मिळाली अाहे. त्यानुसार अापण या सोहळ्याचं नियोजन करू शकतो, असं महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप गियानानी यांनी खास 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या