संपामुळे मंत्रालयातील कामकाजावर परिणाम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (maharashtra) सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने मंगळवारपासून पुकारलेल्या संपाचा (strike) परिणाम मंत्रालयातील कामकाजावर झाला आहे.

मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशीच मंत्रालयातील (mantralaya) सुमारे निम्मे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने त्याचा फटका कामाच्या निमित्ताने मंत्रालयात आलेल्या अभ्यागतांना बसल्याचे दिसून आले.

मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे न घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी संघटना ठाम आहे.

जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी, शासकीय रिक्त पदे भरावीत यासह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी, जिल्हा परिषद तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सुरू झालेल्या संपात सहभागी झाले आहेत.

कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने संप आज, बुधवारीही सुरू राहण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी सहभागी होत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

परिणामी मंत्रालयातील एकूण 7 हजार कर्मचाऱ्यांपैकी आज केवळ 3619 कर्मचारी उपस्थित राहिल्याची नोंद करण्यात आली.

तसेच त्यामुळे विविध विभागातील कामाची गती मंदावली होती. या संपामुळे नागरिकांची प्रलंबित कामे आणखी खोळंबण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

सत्र न्यायालयासाठी जव्हारचा प्रस्ताव

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर 23-24 एप्रिलला 3 तास वाहतूक बंद

पुढील बातमी
इतर बातम्या