सबवेवर चिखल !

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

खार - खार पूर्वमधील दीपक वाडीत असलेल्या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. पाऊस असला किंवा नसला तरी या भुयारी मार्गात पाणी साचलेलं असते. तुटलेल्या पाईपमधून निघालेले पाणी पायऱ्यांजवळ जमा होते आणि तेथून ये-जा करणाऱ्यांना त्याच चिखलातून प्रवास करावा लागतो. तसेच या भुयारी मार्गात असलेली लाईट ही खराब झाली आहे. भुयारी मार्गाच्या या दुर्दशेला रस्ते आणि बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या