दादरच्या फुलमार्केटजवळ अचानक पेटली टॅक्सी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रस्त्यावरच एका टॅक्सीने अचानक पेट घेतल्याची घटना दादरच्या सेनापती बापट मार्गावर बुधवारी सकाळी 7.25 वाजता घडली. सुरुवातीला टॅक्सीतून धूर निघू लागल्याने टॅक्सीचालक अजितलाल यादव (40) यांनी ती जागेवरच थांबवली. त्यानंतर टॅक्सीला आग लागली आणि संपूर्ण टॅक्सी जागीच जळून खाक झाली.

सकाळी टॅक्सीने भर रस्त्यात पेट घेतल्यामुळे दादरच्या सेनापती बापट मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. आग विझल्यानंतर काही वेळाने वाहतून पूर्ववत सुरू करण्यात आली. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिसांनी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या