मुंबईत पावसाची विश्रांती, पुन्हा उकाडा वाढला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. चक्रीवादळामुळं मुंबईत मागील २ दिवस ढगाळ वातावरण होतं. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार हजेरीमुळं मुंबईत गारवा निर्माण झाला होता. परंतु, २ दिवसाच्या पावसानंतर मुंबईत पुन्हा उकाडा वाढला आहे. मुंबईच्या तापमानात काही अंश वाढ झाली आहे. ३१ मे रोजी मुंबईचं तापमान ३६ अंश सेल्ससिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र चक्रीवादळामुळं तापमानात घट झाली आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.  

शुक्रवारी मुंबईतील सांताक्रुझ वेधशाळेनुसार, मुंबईचं कमाल तापमान २९.७ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं आहे. तसंच, कुलाबा वेधशाळेनुसार कमाल तापमान २९.२ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२.० अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं आहे.

सध्या मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. गुरूवारी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांच्या काही भागात पुढील काही तासांत मुसळधार पावसानं हजेरी लावल्याची माहिती हवामान विभागानं दिली.

मुंबईत गुरूवारी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. परंतु, या पहिल्याचं पावसात मुंबईतील सखल भागात पाणी साचलं. किंग सर्कल येथील भागात पाणी साचल्यानं बेस्ट बसच्या मार्गात प्रशासनाला बदल करावा लागला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या