मुंबईत थंडी वाढली; नागरिकांची गरम कपड्याला पसंती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या तापमानात घट झाली असून, अनेकांनी गरम व उबदार कपडे घालण्याला पसंती दिली आहे. मुंबई उपनगरात सलग चौथ्या दिवशी अनेक ठिकाणी किमान तापमान २० अंशापेक्षा कमी नोंदविण्यात आलं. तर दुसरीकडं आर्द्रतेचं प्रमाण कमी झालं असून, कमाल तापमानात मात्र घट झालेली नाही.

गेल्या आठवड्यातील चढ्या तापमानानंतर गुरुवारपासून उपनगरातील किमान तापमानात घट होऊन ते २० अंशाखाली घसरलं. रविवारी सांताक्रूझ केंद्रावर १८.४ अंश किमान तापमान नोंदविण्यात आलं. तसंच, कुलाबा केंद्रावर शनिवारच्या तुलनेत एक अंशाची वाढ झाली.

पुढील २ दिवस तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र कमाल तापमानात घट न होता सांताक्रूझ केंद्रावर ३५.३ अंश नोंद झाली. दरम्यान, आद्र्रतेच्या प्रमाणात सरासरीच्या तुलनेत ६ ते ९ टक्क्यांची घट झाली आहे.

मागील आठवड्यातील चढ्या तापमानानंतर या आठवड्याच्या मध्यावर शहर आणि उपनगरातील किमान तापमान घसरण्यास ३ दिवसांपूर्वी सुरुवात झाली. गुरुवारी उपनगरातील किमान तापमानात ३ अंशाची, तर शुक्रवारी आणखी १ ते दीड अंशाची घट होऊन या मोसमात प्रथमच ते २० अंशाखाली गेले.

पुढील बातमी
इतर बातम्या