उकाडा वाढल्यानं मुंबईकर घामाघूम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर असले तरी ऊकाड्यात काही प्रमाणात वाढ झाल्यानं मुंबईकर घामाघूम होत आहेत. कोरोनामुळं नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. परंतु, उकाड्यामुळं घरी राहणं अनेकांना कठीण जात आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गरम पदार्थांचं सेवन करण्याचे राज्य सरकारनं आदेश दिले असून, एसीचा वापर कमी करण्यास सांगितलं असताना ऐन उन्हाळ्यात उकाडा सहन होत नाही आहे.

मुंबईसह राज्यभरातील तापमानातही वाढ झाली आहे. मात्र असं असलं तरी, अवेळी कोसळणारा पाऊस नागरिकांना अधिकच तापदायक ठरणार आहे. येत्या काळात कमाल तापमानात आणखी वाढ होणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात उन्हाळा आणखी तापदायक असणार आहे.

बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाची नोंद ४० अंश होईल. राज्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ०.५ ते १ अंशाने अधिक नोंदविण्यात येईल. किमान तापमानात सरासरी ०.५ ते १ अंश एवढी वाढ नोंदविण्यात येईल. 

पुढील बातमी
इतर बातम्या