मुंबईत थंडीचा कडाका वाढणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. (Mumbai Cold Wave)

किमान तापमानात वाढ झाल्यामुळे मुंबईतील आर्द्रतेत किंचित घट झाली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढेल असाही अंदाज आहे. उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे पहिल्या आठवड्यातच तुम्हाला थंडी जाणवू शकते. बुधवारी हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रात किमान तापमान 21.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान 19.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

1 फेब्रुवारीनंतर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या खाली जाईल आणि ही घसरण 4 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील. त्यानंतर किमान तापमान पुन्हा 17 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. या काळात कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस राहील.


हेही वाचा

अंधेरीत BMC ची झाडे लावा मोहीम जोमात

ठाणे महापालिकेच्या उद्यानांमधील झाडांवर आता QR कोड

पुढील बातमी
इतर बातम्या