आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामामुळे इंदिरानगर जलसाठ्याकडे जाणाऱ्या 813 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर परिणाम झाला आहे.
यावर उपाय म्हणून MMRDA ने नियोजित 2,200 मीटरपैकी 800 मीटर लांबीची नवीन 900 मिमी व्यासाची उच्च क्षमतेची जलवाहिनी टाकली आहे. आता जुन्या जलवाहिनीला बंद करून नव्या जलवाहिनीची शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेशी जोडणी केली जाणार आहे.
सुरुवात: 12 जून 2026, शुक्रवार सकाळी 9 वाजता
समाप्ती: 13 जून 2026, शनिवार सकाळी 9 वाजता
कालावधी: 24 तास
महापालिकेने सांगितले की, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.
इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, दावळेनगर
सावरकरनगर
लोकमान्य नगर (पाडा क्रमांक 2, 3 आणि 4)
चैतिनगर, पेरेरानगर, झांजेनगर
श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतिनगर
कैलासनगर, भाटवाडी, वरळीपाडा
रूपादेवी पाडा, रामनगर आणि सी.पी. तलाव परिसर
येऊर आणि लगतचे परिसर
ठाणे महापालिकेने प्रभावित भागातील नागरिकांना आगाऊ पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा