रिक्षा आणि टॅक्सीचे मीटर नव्या भाडेदरानुसार रिकॅलिब्रेट करणे आवश्यक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

१ सप्टेंबर २०२६ पासून मुंबई आणि MMRमध्ये ऑटो-रिक्षा तसेच काळी-पिवळी मीटर टॅक्सीचे भाडे वाढणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण अर्थात MMRTA ने नुकतीच सुधारित भाडेदर रचना निश्चित केली आहे.

नव्या दरांनुसार, ऑटो-रिक्षासाठी पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी किमान भाडे 27 रुपये असणार आहे. तर काळी-पिवळी मीटर टॅक्सीसाठी पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 33 रुपये आकारले जाणार आहेत.

1.5 किलोमीटरनंतरच्या प्रवासासाठी सुधारित प्रति किलोमीटर दरानुसार भाड्याची गणना केली जाणार आहे.

मीटर तपासण्याचे आवाहन

नवीन दर लागू होण्यापूर्वी रिक्षा आणि टॅक्सीचे मीटर नव्या भाडेदरानुसार रिकॅलिब्रेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे भाडे देण्यापूर्वी मीटरमध्ये सुधारित दर लागू झाले आहेत का, हे तपासावे, असे परिवहन विभागाने आवाहन केले आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी प्रवाशांनी दररोजच्या प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

भाडेवाढीमागे कोणते कारण?

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित कटकर यांनी सांगितले की, नवीन भाडे निश्चित करताना अनेक आर्थिक घटकांचा विचार करण्यात आला.

यामध्ये वाहने खरेदी करण्याच्या वाढलेल्या किंमती, ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात CPI मधील बदल आणि वाहन कर्जावरील सध्याचे व्याजदर या प्रमुख बाबींचा समावेश आहे.

त्यामुळे आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMRमधील इतर भागांत रिक्षा किंवा काळी-पिवळी टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

1 सप्टेंबरपासून प्रवासाला निघताना नवीन भाडेदर आणि मीटरची रक्कम तपासायला विसरू नका!


हेही वाचा

मेट्रो 7A च्या कामात मोठा अडथळा

पुढील बातमी
इतर बातम्या